चोरट्यांचा धुमाकूळ; भर दिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:05 AM2018-06-15T00:05:30+5:302018-06-15T00:05:30+5:30
मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातल आहे. हिंगोली शहरात तर चक्क भरदिवसा घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातल आहे. हिंगोली शहरात तर चक्क भरदिवसा घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत.
चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे बाहेरील जिल्ह्यातील चोरट्यांची टोळी हिंगोली दाखल झाली की काय? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. विशेष म्हणजे बळसोंड परिसरातील शिक्षक कॉलनीतील सुर्यभान गिलवलकर यांचे १३ जून रोजी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडून रोकड १ लाख व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ३७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. तसेच ७ जून रोजी हिंगोली शहरातील बांगरनगर येथेही घराचे कुलुप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. भरदिवसा घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.