फक्त १७२ लाभार्थ्यांना मिळाला तिसरा हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:43 PM2017-11-30T23:43:01+5:302017-11-30T23:43:06+5:30
वाळूची वाहतूक बंद झाल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम रखडलेले आहेत. आतापर्यंत केवळ १७२ लाभार्थ्यांनाच घरकुलाचा हप्ता मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वाळूची वाहतूक बंद झाल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम रखडलेले आहेत. आतापर्यंत केवळ १७२ लाभार्थ्यांनाच घरकुलाचा हप्ता मिळाला आहे.
हिंगोली तालुक्यात विविध योजनांमध्ये एकूण ९४६ घरकुले मंजूर आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६- १७ मध्ये ६१८, याच योजनेत सन २०१७- १८ मध्ये ८९ आणि रमाई आवास योजनेत १९९, शबरी घरकुल योजनेत ३१, पारधी घरकुल योजनेत ९ अशी मंजूर घरकुलांची संख्या आहे. पहिला, दुसºया आणि तिसºया हप्त्यापर्यंत कामे गतीने झाले. नंतर वाळूचा तुटवडा जाणवू लागल्याने घरकुलाच्या कामांना ब्रेक लागला. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेत ३१८ लाभार्थ्यांना दुसरा तर १४० लाभार्थ्यांना तिसरा, रमाई आवास योजनेत ८० जणांना दुसरा, फक्त १८ लाभार्थ्यांना तिसरा, आणि शबरी घरकुल योजनेत १५ लाभार्थ्यांना दुसरा आणि १० लाभार्थ्यांना तिसरा, पारधी घरकुल योजनेत ५ जणांना दुसरा तर ४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला आहे. तर चारही योजनेत तब्बल ७८९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे.
केवळ वाळू नसल्याने लाभार्थ्यांना आपल्या घराचे काम उकरता येत नसल्याचे भयंकर चित्र समोर आले आहे. लाभार्थ्यांनी घराचे काम गतीने होईल, या आशेवर घर मोडून झोपडीत राहणे सुरु केले आहे. तर लाभार्थी वाळू मिळावी म्हणून कसोशीने प्रयत्न करीत आहेत.