हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे यंदा १७० वे वर्ष; आकाशवाणीने उद्यापासून होणार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:45 PM2024-10-01T19:45:14+5:302024-10-01T19:46:04+5:30

हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव म्हैसूरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखला जातो.

This year marks the 170th year of Hingoli's historic Dussehra festival; AIR will start from tomorrow | हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे यंदा १७० वे वर्ष; आकाशवाणीने उद्यापासून होणार प्रारंभ

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे यंदा १७० वे वर्ष; आकाशवाणीने उद्यापासून होणार प्रारंभ

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, २ ऑक्टोबर रोजी आकाशवाणीने या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यादरम्यान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

रामलीला मैदानावर १५ सप्टेंबर रोजी बासापूजन झाले. त्यानंतर कृषी प्रदर्शनी उभारणीला सुरुवात झाली. प्रदर्शनी उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, २ ऑक्टोबर रोजी शहरातील जलेश्वर मंदिरात सायंकाळी ७ वाजता आकाशवाणीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता जि.प.प्रशालेच्या मैदानावर क्रिकेट सामने खेळविण्यात येणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हनुमान मूर्तीची मिरवणूक तर रात्री ८ वाजता कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. ४ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता बद्रिनारायण मंदिरात श्रीराम जन्माचा कार्यक्रम, ५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता एमआयडीसी (लिंबाळा मक्ता) येथे बॅडमिंटन स्पर्धा, सकाळी ११:३० वाजता देशमुख सभागृह येथे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता एमआयडीसी (लिंबाळा मक्ता) येथे बॅडमिंटन स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता लाॅन टेनिस सामने, ७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम, ८ ऑक्टोबरला सकाळी ७:३० वाजता मॅरेथाॅन स्पर्धा, दुपारी ४ वाजता फुटबाॅल स्पर्धा, ९ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता सायकलिंग स्पर्धा, सकाळी ११ वाजता जि.प.मैदानावर शंकरपट, १० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता कुस्त्यांची दंगल, ११ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता कबड्डी स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता ऑर्केस्ट्रा, १२ ऑक्टोबरला रात्री १०:४१ वाजता रावणदहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भरतभेट व मिरवणुकीने दसरा महोत्सवाची सांगता होणार आहे.

दसरा महोत्सवाचे यंदा १७० वे वर्ष
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव म्हैसूरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखला जातो. यंदा दसरा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, भरगच्च कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

दहा दिवस होणार रामलीलेचे सादरीकरण
दसरा महोत्सवात ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान सतना (मध्यप्रदेश) येथील श्री हनुमान रामायण प्रसारक मंडळाचे पंडित रामकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २० कलावंत रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती गणेश साहू यांनी दिली.

Web Title: This year marks the 170th year of Hingoli's historic Dussehra festival; AIR will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.