हिंगोली जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:27 AM2018-01-21T00:27:51+5:302018-01-21T00:28:26+5:30
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर २० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात जिल्हाभरातील आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर २० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात जिल्हाभरातील आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण देशातून आलेल्या आंबेडकरी जनसमुदायावर दगडफेक करुन अनेकांना जखमी केले होते. तसेच वाहनांच्या काचा फोडून जाळपोळही केली होती. विशेष म्हणजे या हल्ल्यात एका तरुणाचा बळी गेला आहे. त्यामुळे हल्लेखोराविरुद्ध कायदेशिर गुन्हे दाखल करुन दंगल घडविणाºयावर सूत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. तसेच ३ जानेवारी रोजी महाराष्टÑ बंदमध्ये सहभागी झालेल्या अंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्या कार्यकर्त्यांची सुटका करावी आदी मागण्यासाठी आंबेडकरी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला होता. तर जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र वाढे, प्रभावती खंदारे, अशोक खंदारे, अशोक कांबळे, ज्योतीपाल रणवीर, बबन भुक्तर, शेख अतिक खुर रहेमान, अॅड. धम्मदीपक खंदारे, समाधान खंदारे, प्रकाश गव्हाणे, रुपेश कदम, सतीश पंडित, किरण पाईकराव आदींच्या स्वाक्षºया आहेत.
जिल्हाधिकारी कचेरी : पोलीस बंदोबस्त
१ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्या व आर्थिक नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासह भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली. तसेच सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील प्रकरणात बौद्ध समाजाच्या युवकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन खरे आरोपी व सूत्रधारांना अटक करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर जागो- जागी वाहतूक वळविण्यात आली होती.