महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 05:34 PM2022-03-01T17:34:04+5:302022-03-01T17:34:24+5:30

सलग तीन वर्षापासून देवालय महादेवाचे दर्शन बंद असल्याने दरवाजे खुले करताच भाविकांनी नागनाथ महाराज की जय हर हर महादेवच्या गजरात प्रवेश करत रांगेत दर्शन घेतले.

Thousands of devotees pay obeisance to Lord Nagnath on the occasion of Mahashivaratri | महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन

महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन

Next

औंढा नागनाथ( हिंगोली ): बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे मंदिर परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने व गर्दीने फुलून गेला आहे. यावेळी संस्थान सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर यांनी प्रभू नागनाथाची विधीवत महापूजा करून देशावरील कोरोनाचे संकट दूर होऊ देण्याचे नागनाथास साकडे घातले. 

दरम्यान सोमवार उत्तर रात्री १२:३० वाजता ज्योतिर्लिंग नागनाथाची विधीवत महापूजा संस्थान सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, गोदावरी बांगर, आमदार प्रज्ञाताई सातव,संस्थान अध्यक्ष तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यानंतर रात्री २ वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दार खुले करण्यात आले. सलग तीन वर्षापासून देवालय महादेवाचे दर्शन बंद असल्याने दरवाजे खुले करताच भाविकांनी नागनाथ महाराज की जय हर हर महादेवच्या गजरात प्रवेश करत रांगेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या दरम्यान दिवसभरात हजारो भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले तर संस्थानला देणगी व दर्शन पास मधून भरघोस उत्पन्न ही मिळाले. 

दरम्यान, कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत होते तर आनेका कडून भाविकांना उसळीची सोय करण्यात आली होती तर संस्थांनकडून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या यावेळी  आमदार संतोष बांगर यांनी श्री प्रभू नागनाथास राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे असे साकडे घातले मंत्रोपचार तुळजादास भोपी,दिना पाठक, नीळकंठ देव यांनी केले तर दिवसभर पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपाधिक्षक विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे मुंजाजी वाघमारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार यांच्यासह दोनशेच्यावर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Thousands of devotees pay obeisance to Lord Nagnath on the occasion of Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.