जवळ्यात तीन बसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:55 PM2018-07-21T23:55:05+5:302018-07-21T23:55:28+5:30

परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठेवली.

Three bus bunkers collapsed | जवळ्यात तीन बसची तोडफोड

जवळ्यात तीन बसची तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठेवली.
जवळाबाजार येथील बसस्टॅन्ड परिसरामध्ये शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने रास्ता रोको केला. यावेळी टायर जाळून रस्ता बंद केला. त्यामुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मोर्चातील काही जणांनी परभणी रस्त्यावर उभ्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेसवर प्रचंड दगडफेक केली. यामध्ये अंबाजोगाई-नागपूर (बस क्र. एमएच ४० वाय ५४३२) या नागपूर आगाराच्या बसचे मोठे नुकसान झाले. परभणी आगाराची बस परभणी- नागपूर (क्र. एमएच २० बी.एल. २६९६) तर हिंगोली आगाराची बस एम.एच. ०७ सी ७४५९ च्याही काचा फोडण्यात आल्या. दीड तासानंतर आंदोलन संपले. मात्र आंदोलन सुरू असताना जमाव बस फोडत असल्यामुळे पोलिसांची मोठी धांदल उडाली. त्यानंतर त्यांनी काही वाहनांना पोलीस बंदोबस्तामध्ये दूर नेले.
यावेळी हट्ट्याचे सपोनि गुलाब बाचेवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, जमादार शे. खुद्दूस, शे. लाल सह सर्व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त केला होता. मात्र तोडफोडीनंतर वसमत येथील पोलीस बंदोबस्त मागविला. वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद दाखल झाले. त्यानंतर बस फोडणाºया कार्यकर्त्यांवर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सेनगावात कडकडीत बंद
सेनगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी सेनगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. समाजाच्या वतीने येथील तहसीलदारांना निवेदन देवून मराठा आरक्षण तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. सेनगाव शहर बंदच्या केलेल्या आवाहनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे दिवसभर कडकडीत बंद होती. यासंबंधी येथील तहसीलदारांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी संदेश देशमुख, भारत लोखंडे, सचिन देशमुख, जगदीश देशमुख, साहेबराव तिडके, उमेश देशमुख, शिवाजी देशमुख, डॉ. जगदीश गोरे, संजय टाले, सी.व्ही. झुंगरे, जगदीश गाढवे, प्रकाश गाढवे, गणेश जारे, दत्तराव देशमुख, संदीप बहिरे, डॉ. सुजीत देशमुख, रामेश्वर देशमुख, संतोष तिडके, दिगंबर देशमुख, अनिल गिते, लक्ष्मण गायवाल, सचिन शिंदे, बबन व्यवहारे आदी उपस्थित होते.

Web Title: Three bus bunkers collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.