कोरोनाचे तीन नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:45+5:302021-06-10T04:20:45+5:30

जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. यावेळी हिंगोली परिसरात ११३, वसमत ११५, सेनगाव ५२, औंढा १०० ...

Three new patients with corona; Death of both | कोरोनाचे तीन नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू

कोरोनाचे तीन नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू

Next

जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. यावेळी हिंगोली परिसरात ११३, वसमत ११५, सेनगाव ५२, औंढा १०० तर कळमनुरी परिसरात ९२ जणांची तपासणी केली होती, यात एकही रुग्ण निघाला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात ६५ जणांची तपासणी केली असता, यात आनंदनगर व एसआरपीएफ कॅम्पमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. वसमत परिसरात १७९ जणांची तपासणी केली असता, वसमत येथे एक रुग्ण आढळून आला. औंढा परिसरात ४६ जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता, एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, बुधवारी २५ रुग्ण बरे झाले असून, यामध्ये जिल्हा रुग्णालयातील १२, सेनगाव तीन, लिंबाळा एक, कळमनुरी सात तर, औंढा येथील दोन बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत १५ हजार ८२६ रुग्ण आढळले असून, यापैकी १५ हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. आढळलेल्या १३७ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील ६५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर तर, १० रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

आजपर्यंत ३७१ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आजपर्यंत ३७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी दोघांचा मृत्यू झाला असून, यात हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या कळमकोंडा (ता. कळमनुरी) येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच द्वारका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कळमनुरी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Three new patients with corona; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.