औंढ्यात कयाधूचा तीन गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:26 AM2018-08-22T00:26:00+5:302018-08-22T00:26:55+5:30
तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.
औंढा तालुक्यातील औंढा नागनाथ, नागेश्वडी, वाळकी, पिपलदरी, सुरेगाव, येळी, केळी व काही छोटे तलाव सततच्या पावसामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पावसामुळे सर्वच ओढे व नद्यांना पाणी आले आहे. यामुळे गोळेगावमार्गे कोंडशी, दरेगाव, नांदापूर, टाकळगव्हाण आदी गावांचे मार्ग काही काळ बंद झाले होते. या पाण्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हळद, सोयाबीन, कापूस तूर आदी पिके पाण्याखाली आले आहेत.
केळी जलाशय ९0 टक्क्यांवर
केळी जलाशय ९० टक्के भरला. तो परिसरात सर्वांत मोठा असून तीन वर्षांनंतर हे चित्र दिसत आहे. त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. पार्डी, सावळी, येळी, केळी, हिवरखेडा साळणा ई गावाना याचा फायदा होणार आहे..
४हिवरखेडा येथील शेतकरी पंढरी गिते यांचा दीड एकर कापूस उन्मळला. तर देवीदास गिते, संतोष गिते, विलास गिते, भास्कर गिते आदींच्या कापसाची हीच अवस्था आहे.
केळी ते येळी फाटा मध्यभागी असलेल्या ओढ्याला मोठा पूर आल्याने केळी गावकºयांचा संपर्क तुटला. या भागातील नागरिकांना हा प्रश्न नेहमीच भेडसावतो.
४काठोडा, अंजनवाडा, अनखळी या चार गावात पावसामुळे सुमारे १५ जणांची घरे पडली आहेत. तलाठ्यांनी तसा पंचनामा केले असून अहवाल जिल्हाधिकाºयांना कळविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे