थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

By विजय पाटील | Published: February 22, 2023 02:58 PM2023-02-22T14:58:59+5:302023-02-22T14:59:22+5:30

फौजदारांवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.

Thrilling! Two bullets were fired at Faujdar while settling the dispute in Kalamnuri | थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

googlenewsNext

कळमनुरी (जि.हिंगोली) : मोक्कातील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या फौजदारावर झटापटीत दोन गोळ्या झाडल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. मात्र नेमक्या आरोपीनेच गोळ्या झाडल्या की नाही? हे अद्यापही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले नाहे.

आरोपीचे नाव बबलू हत्यारसिंग टाक (वय २८ वर्षे, रा.  इंदिरानगर कळमनुरी) हा आरोपी मोक्काचा आहे. तो कळमनुरी येथे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी त्याला अटक करण्यासाठी फौजफाटयासह गेले होते. अटक करताना झटापटीमध्ये २ ते ३ गोळ्या माजिद यांना लागल्या. या गोळ्या फौजदार माजिद खान यांच्या डाव्या व उजव्या छातीवर लागल्या.

कळमनुरी येथे फौजदार माजिद यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोनी वैजनाथ मुंडे यांनी पाहणी केली. या प्रकारामुळे कळमनुरीत एकच खळबळ उडली आहे. घटनास्थळी तसेच रुग्णालय परिसरात बघ्यांचीही गर्दी जमली होती. 

पोलिसाकडील शस्त्रातून राउंड फायर
या प्रकरणाबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्रेस नोट काढण्यात आली आहे. यामध्ये मोक्का कायद्यातील फरार आरोपी बबलूसिंग ऊर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, फौजदार शेख माजिद व कर्मचाऱ्यांचे पथक अटक करण्यासाठी गेले होते. तेथे आरोपीने पोलिस पथकावर हल्ला करून झटापट केली. पळून जाण्याचा प्रयत्न करताना व झटापट चालू असताना पोलिसाकडील शस्त्रामधून एक राऊंड फायर झाला. त्यात फौजदार माजिद जखमी झाल्याचे म्हटले आहे.

Web Title: Thrilling! Two bullets were fired at Faujdar while settling the dispute in Kalamnuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.