परीक्षेसाठी ‘केंद्र द्या केंद्र’ म्हणण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:01 AM2018-02-28T01:01:01+5:302018-02-28T01:01:05+5:30
शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील कापडसिनगी येथे स्वयंम अर्थसहाय्य अनुदानावर चालणाºया दोन माध्यमिक विद्यालयाच्या कारभारामुळे ऐन वेळी दहावीची परीक्षा देणा-या ६९७ विद्यार्थ्यांची अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील परीक्षा नियोजनाचे वाभाडे निघाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील कापडसिनगी येथे स्वयंम अर्थसहाय्य अनुदानावर चालणाºया दोन माध्यमिक विद्यालयाच्या कारभारामुळे ऐन वेळी दहावीची परीक्षा देणा-या ६९७ विद्यार्थ्यांची अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील परीक्षा नियोजनाचे वाभाडे निघाले आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्राचा शोध घेत अनेक शाळेची दारे ठोठावत फिरत आहेत.
सेनगाव तालुक्यात शालांत प्रमाणपत्र परीक्षेकरिता शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाकडे पाठविलेल्या माहितीनंतर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात तालुक्यात एकूण ९ परीक्षा केंद्राचे नियोजन केले होते; परंतु स्वयंम अर्थसहाय्य मान्यतेवर चालणाºया तालुक्यातील कापड सिनगी येथील संत रेखेबाबा माध्यमिक विद्यालय व गजानन माध्यमिक विद्यालय या दोन शाळेच्या गोंधळाने शिक्षण विभाग मात्र तोंडघशी पडला असून परीक्षा दोन दिवसांवर आली असताना या शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवायचे कुठे? हा प्रश्न गंभीर आहे. यासाठी तालुकाभर परीक्षा केंद्राचा शोध आहे. कापडसिनगी येथे स्वयंअर्थसहाय्य मान्यता मिळालेल्या संत रेखेबाबा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये तब्बल ३०२ विद्यार्थी तर गजानन माध्यमिक विद्यालयात ३९८ विद्यार्थी असे एकुण ६९७ विद्यार्थी या दोन विद्यालयात दहावीची परीक्षा देणार आहेत. परंतु या दोन्ही विद्यालयात दहावीची परीक्षा देणारे ६९७ रेकॉर्डब्रेक विद्यार्थी असल्याची माहितीच तालुका शिक्षण विभागासह जि.प.च्या शिक्षण विभागाला नाही. परीक्षा आठ दिवसांवर आल्यानंतर या दोन विद्यालयात दहावीचे ६९७ परीक्षार्थी असल्याचे परीक्षा बोर्डाने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रानंतर समोर आले. तब्बल ६९७ विद्यार्थी वाढल्याने सेनगाव पं.स. समितीचे गटशिक्षणाधिकारी सीताराम जगताप यांनी या दोन्ही शाळेला भेट देवून वाढीव परीक्षा केंद्राचे नियोजन सुरू केले. परंतु या दोन्ही विद्यालयाला कोणत्याही प्रकारची इमारत नाही, ना सुविधाही, दोन्ही ही विद्यालयात १०० विद्यार्थीही बसू शकतील की नाही, याची खात्री नसल्याने शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी या विद्यार्थ्यांसाठी सेनगाव शहरात वाढीव परीक्षा केंद्राचा शोध घेणे सुरू केले.
... हॅलो पान ४ वर