मंजूर अनुदानासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपोषणाची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:12+5:302021-07-20T04:21:12+5:30
मंजूर झालेले अनुदान दोन हप्त्यांत दर सहा महिन्यांनी दिले जाते; परंतु एकत्र हप्ता कधीच मिळत नाही, तसेच ...
मंजूर झालेले अनुदान दोन हप्त्यांत दर सहा महिन्यांनी दिले जाते; परंतु एकत्र हप्ता कधीच मिळत नाही, तसेच वेळेत मिळत नाही. गतवर्षी प्रथम हप्त्याची रक्कम पाच हप्त्यांत दिली गेली. दुसरा हप्ता मार्च महिनाअखेर वाटप होणे आवश्यक असताना, त्यापैकी अद्यापही काहीच मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा ग्रंथालय कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे. शासनाने सर्व बाबींचा विचार करून जिल्हा ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अनुदानात वाढ करून मंजूर झालेले अनुदान त्वरित मंजूर करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
२० जुलै रोजी माजी आमदार गंगाधरराव पटणे हे नांदेड येथे उपोषण करणार आहेत. त्यांच्या उपोषणाला हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाने पाठिंबा दर्शविला आहे. निवेदनावर हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांची स्वाक्षरी आहे.