आज प्रभारी सभापती निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:00 AM2018-07-07T00:00:33+5:302018-07-07T00:00:48+5:30
येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे.
हिंगोली पंचायत समितीत शिवसेना व काँग्रेसमधील करारानुसार सव्वा वर्षानंतर सेनेचे सभापती विलास काठमोडे व काँग्रेसच्या उपसभापती कावेरी कºहाळे यांनी राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसला सभापतीपद तर सेनेला उपसभापतीपद मिळणार आहे. मात्र राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन पदाधिकारी निवड अजून झाली नाही. त्यामुळे तात्पुरता प्रभार जि.प.च्या चारपैकी एका सभापतीकडे जाणार आहे. परंतु ही निवड चिठ्ठ्या काढून शनिवारी जि.प.त पदाधिकाऱ्यांसमक्ष हाईल .
दरम्यान, सभापती-उपसभापतींची पदे रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. निवड कार्यक्रम घोषणेची प्रतीक्षा आहे.