शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:13+5:302021-05-31T04:22:13+5:30
समाजकल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश घेण्यापासून ते अर्ज भरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...
समाजकल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश घेण्यापासून ते अर्ज भरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास दोन वेळा मुदतवाढ दिली होती. आता ही मुदत ३१ मे रोजी संपणार असून, यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाहीत. त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागणार आहे. अनु. जाती, इमाव, विजाभज, विमाप्र मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशीप संबंधित सर्व योजनांचे कामकाज https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन २०२०-२१चे अर्ज ३१ मेपूर्वी भरावेत. परिपूर्ण भरलेले अर्ज ३१ मेपूर्वी सादर करावेत, अशी सूचना समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी महाविद्यालयांना दिली होती. विद्यार्थ्यांनीसुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावेत, असे आवाहन मिनगिरे यांनी केले आहे.