आजपासून सैलानी यात्रेसाठी २५ जादा बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:45 AM2018-02-26T00:45:04+5:302018-02-26T00:45:09+5:30
सैलानी यात्रोत्सवात ये-जा करणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंगोली आगारातर्फे २५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बुलढाणा मार्गावरील बसेस संख्या वाढविली आहे. २६ फेबु्रवारी ते ७ मार्च या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सैलानी यात्रोत्सवात ये-जा करणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंगोली आगारातर्फे २५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बुलढाणा मार्गावरील बसेस संख्या वाढविली आहे. २६ फेबु्रवारी ते ७ मार्च या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत.
हिंगोली आगारातर्फे दरवर्षी यात्रोत्सव काळात जादा बसेस सोडण्यात येतात. सोमवारपासून हिंगोली आगारातून सैलानी यात्रेसाठी २५ जादा बसेस धावणार आहेत. अशी माहिती आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी दिली. सैलानी येथे दर्शनासाठी जाणाºया भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी असते. यावेळी प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सदर बस हिंगोली स्थानकातून प्रवाशांच्या गर्दीप्रमाणे सोडण्यात येणार आहेत. जादा बसेसवरील वाहक व चालकांना कर्तव्य बजावण्याच्या सूचनाही आगारातर्फे देण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे दर्शनासाठी जाणाºया भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हिंगोलीसह, कळमनुरी व वसमत येथील आगारातूनही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. कर्तव्यावर अतिरिक्त वाहक व चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सैलानी येथे जाणाºया बस संदर्भात आवश्यक माहिती हवी असल्यास प्रवाशांनी आगारप्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीपासून जादा बसेस धावरणार आहेत.