आजपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:41 AM2018-04-23T00:41:51+5:302018-04-23T00:41:51+5:30
रस्ता सुरक्षा अभियान २३ एप्रिल ते ७ मे २०१८ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहर वाहतूक शाखा हिंंगोली येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रस्ता सुरक्षा अभियान २३ एप्रिल ते ७ मे २०१८ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहर वाहतूक शाखा हिंंगोली येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कार्यकारी अभियंता . एस. जी. देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, विभागीय नियंत्रक जे. एन. सिरसाठ, उपविभागीय अधिकारी राहूल मदणे, एच. डी. भोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.