आज हिंगोलीत महाआरोग्य शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:32 AM2019-02-10T00:32:28+5:302019-02-10T00:32:45+5:30
येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील भव्य मैदानावर विविध प्रकारच्या आजारांचे फलक लावून स्टॉल उभारले असून पार्किंगची वेगळी यंत्रणा करण्यात आली आहे. या शिबिराला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हजेरी लावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील भव्य मैदानावर विविध प्रकारच्या आजारांचे फलक लावून स्टॉल उभारले असून पार्किंगची वेगळी यंत्रणा करण्यात आली आहे. या शिबिराला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हजेरी लावणार आहेत.
या शिबिरासाठी मागील आठ दिवसांपासून तयारी सुरू होती. जिल्हाभरातील शासकीय आरोग्य संस्थांमधून रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. यात गंभीर आजाराच्या रुग्णांनाच या शिबिरासाठी पाठविण्यास सांगण्यात आले होते. यात १.७0 लाख रुग्णांची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली होती. आज सकाळपासून या ठिकाणी शासकीय यंत्रणा, विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवक राबत होते. पार्किंगसाठीचा परिसर स्वच्छ केला असून रेल्वे पटरीच्या बाजूने सुरक्षिततेचे उपाय, स्वच्छतागृहे, कचराकुंड्या आदींची व्यवस्था करण्यात आली. या शिबिरासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरून आलेल्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यात योग्य पद्धतीने नियोजन होण्यासाठी कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या. अनेक नामांकित व आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर येणार असल्याने त्यांचा वेळ वाया जावू नये, असे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
यात १८00 तज्ज्ञ डॉक्टर १९ प्रकारच्या विविध आजारांचे रुग्ण तपासतील. १00 बाह्यरुग्ण कक्षांत तपासणीस इसीजी, बीएसडी, पीएफटी, मॅमोग्राफी आदी साहित्य राहिल. १५00 कर्मचारी व ७ हजार स्वयंसेवक राबतील. १.२५ कोटींची मोफत औषधी उपलब्ध होईल. १ लाख रुग्णांचे जेवण, १८ रुग्णवाहिका, ३ चौकशी कक्ष, ३ आपातकालीन कक्ष असा २५ हेक्टरवर विस्तार राहील.
आज आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, रामेश्वर नाईक, शिवाजी जाधव, डॉ.सचिन बगडिया आदींची या ठिकाणी उपस्थिती होती. तर शेकडो स्वयंसेवकही दिसत होते. या स्वयंसेवकाच्या नियोजनासाठीही वेगळी बैठक दुपारी झाली.