दहावीत हिंगोली जिल्हा विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:06+5:302021-07-17T04:24:06+5:30

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात नियमितच्या १५ हजार ४५५ मुलांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ हजार ४५४ जण प्रविष्ट झाले, तर ...

Top 10 in Hingoli district division | दहावीत हिंगोली जिल्हा विभागात अव्वल

दहावीत हिंगोली जिल्हा विभागात अव्वल

Next

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात नियमितच्या १५ हजार ४५५ मुलांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ हजार ४५४ जण प्रविष्ट झाले, तर १५ हजार ४४८ जण उत्तीर्ण झाले. नियमितचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. यामध्ये पाच जिल्ह्यांत बीडसह संयुक्त दुसऱ्या स्थानी जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यात पुनर्परीक्षार्थींच्या ८७४ जणांची नोंदणी झाली होती. यापैकी ८७३ जण प्रविष्ट झाले, तर ७५७ जण उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ८६.७१ टक्के लागला. यात जिल्हा अव्वल आहे. यामुळेच सर्वसाधारण निकालात जिल्हा पाचही जिल्ह्यांमध्ये अव्वल ठरला आहे.

मुले व मुली पहिल्यांदाच समान

हिंगोली जिल्ह्यात दहावीला ८,३७१ मुले, तर ७,०८३ मुली परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ८,३६८ मुले, तर ७,०८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. चार मुले तर तीन मुली अनुत्तीर्ण झाल्या. एरवी मुलांच्या अनुत्तीर्णतेचे प्रमाण तुलनेत खूप जास्त असते. मात्र, पहिल्यांदाच ते जवळपास सारखेच आहे. पुनर्परीक्षार्थींमध्येही ६५० मुले, तर २२३ मुली होत्या. यापैकी ५६७ मुले, तर १९० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. येथे मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.२३, तर मुलींचे ८५.२० टक्के आहे.

७,४९५ जण विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण

हिंगोली जिल्ह्यात विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७,४९५ एवढी आहे, तर प्रथम श्रेणीत ७,३६२, द्वितीय श्रेणीत ५८२, तर फक्त ९ विद्यार्थी काठावर उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटरमध्ये मात्र २ प्रावीण्यात, २० प्रथम श्रेणीत, ४५ द्वितीय श्रेणीत, तर ६८९ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे रिपीटरर्सनी केवळ उत्तीर्ण होण्याची भूमिका बजावल्याचे दिसत आहे.

Web Title: Top 10 in Hingoli district division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.