ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:37 AM2021-01-08T05:37:14+5:302021-01-08T05:37:14+5:30
या गावात आदिवासी, मराठा, हटकर, मातंग आदी समाजाचे नागरिक एकोप्याने राहतात. वर्षानुवर्ष अखंडित बिनविरोध निवडणुकीची परंपरा या ...
या गावात आदिवासी, मराठा, हटकर, मातंग आदी समाजाचे नागरिक एकोप्याने राहतात. वर्षानुवर्ष अखंडित बिनविरोध निवडणुकीची परंपरा या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ग्रामस्थांनी कायम ठेवली. गावातील वयोवृद्ध नागरिक एका ठिकाणी बसून गावात बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेतात. याला गावातील सर्वजण संमती देतात.
ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत बिनविरोधची परंपरा घोळवा गावाने कायम ठेवून इतर ग्रामपंचायतीसमोर आपला आदर्श निर्माण केला आहे. गावात एकी राहावी, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, गावात भांडणतंटे होऊ नये व निवडणुकीत आर्थिक धूळधाण होऊ नये, यासाठी निवडणुकीसंदर्भात मंदिरात गावकऱ्यांनी बैठक घेतली. तेव्हा युवकांना संधी देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. मंदिरात बसून बिनविरोध सदस्य घोषित करण्यात आले. यानंतर गावातील ७ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये रंजना संतोष कापसे, अर्चना गजानन खुडे, ज्योती अनिल कापसे, छाया ज्ञानेश्वर वानोळे, रत्नमाला सचिन भिसे, राघोजी नामदेव तोरकड, संदीप मारोती पिंपरे हे सदस्य बिनविरोध निवडण्यात आले. गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांनी सांगितले.
बिनविरोध सदस्य निवडीसाठी पं.स. सदस्य हरिदास तोरकड, चेअरमन भगवानराव मगर, गणेशराव मगर, भीमराव तोरकड, प्रभुआप्पा कापसे, विश्वनाथ खुडे, हरिदास वानोळे, सुभाषराव मोरे, हनवता पोटे, दिनकर मगर, देवबाराव मस्के, दशरथ तोरकड, बाळासाहेब मस्के, प्रसाद मगर, प्रभू मगर, गजानन कदम, विजयराव तोरकड, कैलास अंभोरे, गजानन मस्के, दत्तराव अंभोरे, संदीप मगर आदींनी पुढाकार घेतला.