जड वाहनांमुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:25+5:302020-12-31T04:29:25+5:30
विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना ...
विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त
कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पीके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा या राज्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
पेन्शनपुरा येथे रस्त्यावर पाणीच पाणीहिंगोली: शहरातील पेन्शनपुरा भागात रस्त्यावर नालीचे पाणी आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घाण पाण्याला वाट मोकळी करुन देवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील नांदेडनाका, शास्त्रीनगर, इंदिरा चौक आदी भागामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
‘नाल्यांवर औषध फवारणी करा’
हिंगोली: शहरातील कमलानगर, शाहूनगर, जीजामातानगर आदी नगरांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देवून नाल्यांवर औषध फवारणी करुन धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शेतकरी शेती कामात व्यस्त
पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असलञयाचे पहावयास मिळत आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची उगवणही चांगली झाली आहे. यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्याने रबी हंगाम चांगला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
दुभाजकाची मागणी
हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून दुभाजक बसविण्यात आलेले नाही. अनेक वेळा मागणी करुनही कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. वाहनेही वेगाने या ठिकाणावरुन चालविली जात आहेत. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व रेल्वे उड्डाण पुलावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.