वाहतूक शाखेची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:16 AM2019-01-23T00:16:29+5:302019-01-23T00:16:46+5:30
सामान्यांना त्रास न होता हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड, महाविद्यालयीन परिसरात नाहक घिरट्या घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असा आदेशच त्यांनी देऊन टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सामान्यांना त्रास न होता हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड, महाविद्यालयीन परिसरात नाहक घिरट्या घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असा आदेशच त्यांनी देऊन टाकला.
वाहतूक शाखेच्या कार्यालयात योगेशकुमार यांनी आज वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्थापन केलेल्या विविध पथकांच्या प्रमुखांसह कर्मचाºयांची बैठक घेतली. ते म्हणाले, सामान्यांना सहसा पोलीस ठाण्याशी कोणतेच काम पडत नाही. ते ठाण्यात कधी कामानिमित्तच आले तर येतात. माहितीसाठी तर कोणीच येत नाही. मात्र प्रत्येक सामान्याचा वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाशी संबंध येतो. कोणत्याही जिल्हा, राज्य व देशाची ओळखही तेथील वाहतुकीच्या शिस्तीवरून होते. आपल्याकडेही या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. नियमांचे पालन करणाºयांना त्रास न होता ही मोहीम राबवायची आहे. यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे, सुसाट वेगाने वाहन चालविणारे, वाहनाचे आरसी बूक नसणारे, शाळा, महाविद्यालय परिसरात नाहक घिरट्या घालणारे कारवाईतून सुटता कामा नये. यात कोणाचीही गय करू नका. मात्र हे सगळे करताना कुटुंबियांसह व्यवस्थितपणे जाणाºयांवरही पोलिसींग होता कामा नये. पोलिसांची प्रतिमा उजळ होईल अशा पद्धतीचे काम यातून अपेक्षित आहे. एकेरी वाहतुकीचे नियम मोडणाºयांनाही धडा शिकवा, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार म्हणाले, वाहतुकीचे नियम तोडल्यास चालविण्याचा परवानाही रद्द करता येते. यात दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अतिवेगात वाहन चालविणे अशा प्रकारच्या बाबींवर कारवाई करता येते, असे त्यांनी सांगितले.या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक अब्दूल गणी खान, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, उदयसिंह चंदेल, सुडके, किशोर पोटे, फौजदार विनायक लंबे, सुभान केंद्रे, काशीद आदींची उपस्थिती होती. कर्मचाºयांचीही मोठी उपस्थिती होती.
पहिल्याच दिवशी १४१ प्रकरणे
यामध्ये पोनि जगदीश भंडरवार, उदयसिंग चंदेल, अंगद सुडके पोउपनी सुभान केंद्रे, विनायक लंबे व जवळपास ५0 कर्मचाºयांची पाच पथके तयार केली. एका पथकाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली. उर्वरित पथकांनी मोटर वाहन केसेस केल्या. त्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट, विना रजिस्ट्रेशन व इतर मोटर वेहिकल अॅक्टप्रमाणे एकूण १४१ प्रकरणांमध्ये ४६ हजार ८00 रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शिस्त लागेपर्यंत नियमित चालणार आहे.