राज्य महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:14 AM2019-08-24T00:14:49+5:302019-08-24T00:15:08+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण उत्सहात साजरा केला जाणार आहे. ३० आॅगस्ट रोजी पोळा सण ३१ आॅगस्ट रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे.

 Traffic on state highways will be diverted | राज्य महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार

राज्य महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण उत्सहात साजरा केला जाणार आहे. ३० आॅगस्ट रोजी पोळा सण ३१ आॅगस्ट रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे.
कर सणानिमित्ताने पोलीस ठाणे कुरुंदा हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास ५० ते ६० हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षणा घालण्यासाठी येतात. त्यामुळे वसमत औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी होते. सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते.
या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेत वसमत टी पार्इंट ते नागेशवाडीपर्यंत रहदारीचा रस्ता हा ३१ आॅगस्ट २०१९ चे 00.00 ते २४ वाजेपावेतो बंद करण्यात येणार
आहे. त्यामुळे नांदेडकडून
येणारी वाहतूक वसमतमार्गे झिरो फाटा ते हट्टा जवळा बाजारमार्गे नागेशवाडी अशा पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे जाईल. तर औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येणार
आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची माहिती
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.
४त्याकरीता वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा बंद करण्यात येत असून, नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा- जवळा बाजार मार्गे नागेशवाडी अशा पयार्यी मागार्ने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेड जाणारी वाहने नागेशवाडी, मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

Web Title:  Traffic on state highways will be diverted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.