क्युमोकोकल लसीकरणासाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:58+5:302021-07-11T04:20:58+5:30
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथरोग, डेंग्यू, मलेरिया, डायरिया, जलजन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी माहिती देण्यात आली. तसेच कुष्ठरोग व क्षयरोग ...
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथरोग, डेंग्यू, मलेरिया, डायरिया, जलजन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी माहिती देण्यात आली. तसेच कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण सुरू झाले असून, त्याबाबतची माहिती घेण्यात आली.
क्युमोकोकल लसीकरणामुळे बालकांमध्ये न्युमोनियामुळे होणारे मृत्यू कमी होणार आहेत. त्यामुळे पालकांनी ही लस आपल्या पाल्यांना देऊन त्यांची सुरक्षित आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. ही लस परिणामकारक असल्याने ती आवर्जून घ्यावी, यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याची भीती असल्याने ही लस त्यात बालकांचे जीव वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. १५ जुलैपासून ही लस देण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. कैलास शेळके, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. आलोक गट्टू, डॉ. आनंद देशमुख, डॉ. शुभांगाी वाणी, शेख अन्वय, शैलेश मुंदडा, प्रदीप आंधळे, भालेराव, ठोके, जोजारे, शेख आदी उपस्थित होते.