जि.प.त दुसऱ्या दिवशी ५६ जणांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:30 AM2021-07-29T04:30:01+5:302021-07-29T04:30:01+5:30
जि.प.च्या नक्षत्र सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी अध्यक्ष गणाजी बेले, सीईओ आर.बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, ...
जि.प.च्या नक्षत्र सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी अध्यक्ष गणाजी बेले, सीईओ आर.बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, बाजीराव जुंबडे, रूपाली गोरेगावकर, महादेव एकलारे यांची उपस्थिती होती. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या सर्वाधिक ३९ बदल्या झाल्या. यात काही बदल्या आपसी असल्याने हा आकडा ४२ पर्यंत जात आहे. त्यानंतर पंचायत विभागातील १० बदल्या, अर्थ विभागाच्या ४ तर बांधकाम विभागातील ३ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. कालपेक्षा जास्त बदल्या आज झाल्या आहेत. शिवाय, आज मोठ्या विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया असल्याने जि.प.तही गर्दी दिसून येत होती.
आता विभागबदल होणार
हिंगोली जिल्हा परिषदेतील विविध विभागांत पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असलेल्यांवर आता विभागबदलीची टांगती तलवार आहे. अनेकजण एकाच जागी ठाण मांडून बसल्याने त्यांचे हितसंबंध निर्माण झाले. त्यामुळे ते पदाधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याचे गाऱ्हाणे आहे. ही प्रक्रियाही आता समुपदेशन पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. त्यातूनही कोणी सुटले तर टेबलबदल होणार असल्याचेही सांगितले जात आहे.