वाहतूक शाखेने पहिल्याच दिवशी लावला लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:32+5:302021-07-08T04:20:32+5:30
वाहतूक शाखेला प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार आज कामाला प्रारंभ झाला. सकाळी सहायक पोलीस अधीक्षक यतिश ...
वाहतूक शाखेला प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार आज कामाला प्रारंभ झाला. सकाळी सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, ग्रामीणचे उपाधीक्षक वाखारे, पोनि श्रीमनवार यांनी विविध सूचना दिल्या. यात देशमुख म्हणाले, ट्रिपलसीट, विनालायसन्स, विनाक्रमांकाची वाहने, अतिवेगाने धावणारी वाहने यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तर यात कोणाचीही गय न करता कारवाई करावी. नागरिकांनी शहरात येताना सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे ठेवून वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहनही देशमुख यांनी केले.
हिंगोलीत आज दिवसभर वाहतूक शाखेने माेहीम राबविली. यामध्ये विनालायसन्स, ट्रिपलसीट, विना क्रमांकाचे वाहन, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, रॉंग साईडने वाहन नेणे, अतिवेगाने वाहन चालविणे अशा प्रकारांत आज दंड आकारण्यात आला आहे. अशी २१९ प्रकरणे आढळली आहेत. यामध्ये १ लाख पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
या दंडाच्या कारवाईमुळे अनेकांनी आज धसका घेतला. काहीजण खुष्कीच्या मार्गाने शहरातील पर्यायी रस्त्यांवरून जात कारवाई टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. शिवाय कागदपत्रे नसतील अथवा मास्क नसला तरीही अनेकांनी आपला मार्ग बदलल्याचे दिसून येत होते.