आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:44 PM2019-09-23T23:44:47+5:302019-09-23T23:46:05+5:30

तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 A trap of goat is thrown at Asegaon | आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा

आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा केला असून शेतकऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
वसमत तालुक्यातील आसेगाव येथील शेतकरी राजू घोडके यांच्या शेतातील आखाड्यावर मध्यरात्रीनंतर गोठ्यामध्ये बांधलेल्या गोºह्याला बिबट्याने ठार केले. हा प्रकार शेतकºयांना सकाळी समजला. शेतातील परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत असून बिबट्यानेच हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकºयांनी सदर घटना वनविभागात कळवली त्यानंतर वनपाल बी. पी. पवार व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असता पावलांच्या ठशावरून परिसरातील पायाचे ठसे पाहून हा हिंस्त्र प्राणी बिबट्याच असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविला. आपल्या भागात बिबट्या दाखल झाल्याने आखाड्यावर राहणारे शेतकरी मात्र भयभीत झाले आहेत. वनविभागाने गोºहा ठार झाल्याचा पंचनामा केला असता तरी बिबट्याला पकडण्याची कोणतीही उपायोजना केल्या नाहीत. वसमत तालुक्यात यापूर्वीही अनेकदा बिबट्या आढळला होता.
वन विभागाचे वनपाल वनरक्षक व इतर कोणतेही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने घटना घडल्यानंतर कोणाशी संपर्क साधावा, हा प्रश्न नेहमीचाच प्रश्न आहे. तसेच मोबाईलवर संपर्क साधला तरी पंचनामा केल्याशिवाय व घाबरु नका, असा सल्ला दिल्याशिवाय कोणतीही उपाययोजना वनविभागाकडून होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे.

Web Title:  A trap of goat is thrown at Asegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.