ट्रॅव्हल्सलाही प्रवासी संख्या वाढू लागली; ट्रॅव्हल्सची भाडेवाढ मात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:51+5:302021-08-20T04:33:51+5:30
हिंगोली : अनलॉक झाल्यामुळे आणि राखी पौर्णिमा सणामुळे ट्रॅव्हल्सलाही प्रवासी संख्या वाढू लागली आहे. ट्रॅव्हल्सचे दर सध्या तरी वाढले ...
हिंगोली : अनलॉक झाल्यामुळे आणि राखी पौर्णिमा सणामुळे ट्रॅव्हल्सलाही प्रवासी संख्या वाढू लागली आहे. ट्रॅव्हल्सचे दर सध्या तरी वाढले नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या आधी हिंगोली ते पुणे ८०० रुपये भाडे होते. सध्या हे भाडे ६०० रुपये एवढे आहे. हिंगोली ते नागपूर ६०० रुपये भाडे होते. आता हे भाडे ५५० रुपये करण्यात आले आहे. कोरोना महामारी कमी झाली असली तरी एक-दोन रुग्ण आढळून येत असल्यामुळे लोक प्रवास करण्याचे टाळत आहेत. दोन दिवसांवर राखी पौर्णिमा सण असल्यामुळे आणि ट्रॅव्हल्सचा प्रवास सुखकर असल्यामुळे भावाला ओवाळण्यासाठी बहिणी माहेरी जात असल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे सध्यातरी इतर राज्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स सुरू नाहीत. शासनाने परवानगी दिल्यास इतर राज्यात ट्रॅव्हल्स सुरू केल्या जातील.
मार्ग आधीचे भाडे आताचे भाडे
हिंगोली ते पुणे ८०० ६००
हिंगोली ते नागपूर ६०० ५५०
लॉकडाऊनपेक्षा बऱ्यापैकी प्रवासी ...
कोरोनाकाळात ट्रॅव्हल्स फेऱ्या बंदच होत्या. आजमितीस कोरोना कमी झाल्यामुळे अनलॉक करण्यात आले आहे. आता कुठे प्रवासी संख्या वाढू लागली आहे. इतर राज्यांत गाड्या कधी सुरु होणार आहेत ? याची विचारणा प्रवासी करीत आहेत. परंतु, शासनाची परवानगी नसल्यामुळे त्या सध्या सुरू करता येत नाहीत, असे सांगावे लागत आहेत. राखी पौर्णिमा हा सण असल्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना प्रवासी ट्रॅव्हल्सनेच प्रवास करीत आहेत.
डिझेलचे दर वाढले आहेत...
गत काही महिन्यांपासून डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी तिकिटात वाढ करावी लागत आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर, हैदराबाद या ठिकाणच्या ट्रॅव्हल्स बंद आहेत. शासनाने परवानगी दिल्यास जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील ट्रॅव्हल्स सुरू केल्या जातील. डिझेलचे दर वाढले असतानाही प्रवाशांच्या सोयीसाठी काही ठिकाणी तिकिटाचे दर कमीही केले आहेत.
-जगजीतराज खुराणा, हिंगोली