विजेच्या खांबावर झाड कोसळले; पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:11 AM2019-04-05T00:11:18+5:302019-04-05T00:11:45+5:30
शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
कळमनुरी : शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
कळमनुरी शहराला हिंगोली येथून वीजपुरवठा होतो. ४ एप्रिल रोजी वादळी वाऱ्याने विजेच्या पोलवर झाड पडल्याने पोल वाकडे होऊन तारा तुटल्या. त्यामुळे कळमनुरी शहरासह ५५ ते ६० गावांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. कळमनुरी, सांडस, साळवा, गौळबाजार येथील ३३ के व्ही सबस्टेशनवरून ५० ते ६० गावांना वीजपुरवठा केला जातो. ४ ते ५ तास वीजपुरवठा म्हणजे संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंतही वीजपुरवठा खंंडित होता. विजेचे पोल दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत शहराचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे महावितरणचे सहायक अभियंता एस.पी.धकाते, ए.के.चिमूरकर यांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद होती.