मंत्र्यांच्या दौऱ्यात रात्रीत लागली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:39 PM2019-01-12T22:39:29+5:302019-01-12T22:39:52+5:30
नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली.
मागील काही दिवसांपासून काही ठरावीक भाग वगळला तर सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत होते. त्यामुळे प्रमुख मार्गांलगतच कचºयाचे ढीग साचले होते. मंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने झाडून-पुसून कर्मचारी कामाला लावले होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते चकाचक करण्यात येत आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लवाजमा रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. मध्यंतरी न.प.पदाधिकारी व अधिकाºयांनी श्रमदान मोहीम राबविली होती. त्यावेळीच असा लवाजमा रस्त्यावर होता. त्यानंतर आता पुन्हा तेच चित्र पहायला मिळाले. आता मात्र साफसफाईचे काम जोमात केले. शिवाय रस्त्याच्या दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर झाडे लावण्याचे काम रखडले होते. रात्रीतून ही झाडेही लागली आहेत.
पालिकेची इमारत, शिवाजीराव देशमुख सभागृह, नाट्यगृह, लोकनेता गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन आदी कामे नगरपालिकेने हाती घेतली आहेत. त्यातील काही कामांचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील आदी तयारी करताना दिसत आहेत.