सातव यांना लिगोकडून श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:31 AM2021-05-19T04:31:20+5:302021-05-19T04:31:20+5:30
कोरोनानंतरच्या गुंतागुंतीत सातव यांचे आकस्मिक निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले तर ही साईट निवडली गेल्यानंतर लिगो इंडियाच्या प्रकल्पासाठी त्यांचा ...
कोरोनानंतरच्या गुंतागुंतीत सातव यांचे आकस्मिक निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले तर ही साईट निवडली गेल्यानंतर लिगो इंडियाच्या प्रकल्पासाठी त्यांचा भक्कम पाठिंबा व मदत त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात मिळाल्याने कृतज्ञ असल्याचे म्हटले. आपल्या मतदारसंघात नेमका काय प्रकल्प येतोय, हे पाहण्यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेत लिगो हॅनफोर्ड ऑब्झरव्हेटरीला भेट दिली. ते एक तरुण, बहुआयामी व उत्साही व्यकिमत्त्व हाेते. लिगो इंडिया प्रकल्पाचे भक्कम समर्थक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातून सावरण्याची शक्ती मिळो, अशा शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
जगात तिसरा व भारतात होत असलेला पहिला लिगो इंडिया हा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यातील औढा (ना.) तालुक्यात होत असून हा प्रकल्प भारतातील प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र या विषयातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये दक्षिण गोलार्धातील गुरुत्वीय लहरीचे अचूक स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, विश्व उत्पत्तीशास्त्रामध्ये भरीव योगदान प्राप्त होणार आहे. म्हणून याद्वारे भारत देश हा या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये महत्वाचे स्थान प्राप्त करील. सदर प्रकल्पामध्ये आयुका पुणे ही शीर्षसंस्था म्हणून काम करत असून भारतातील प्रमुख दहा संस्था आहेत. ज्यामध्ये तीन अणुउर्जा संस्था, दोन यु.जी.सी., तीन आय.एस.ई.आर.व दोन आय आय.टी यांचा समावेश आहे. या संस्थांद्वारे वापरण्यात येणारे तंत्रज्ञान व त्यासाठी लागणारे विविध पातळीचे तांत्रिक ज्ञान यामुळे आपल्या देशाची औद्योगिक व शास्त्रीय क्षमता वाढविण्यात मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी विशेष तांत्रिकदृष्ट्या सक्षम असे मनुष्यबळ लागणार असल्यामुळे त्याचा फायदा भारतातील शास्त्रज्ञ व विविध संशोधन संस्थातील विद्यार्थ्यांना होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ हिंगोली जिल्ह्याचाच विकास होणार नसून आजूबाजूच्या जिल्ह्यांचा किंबहुना मराठवाड्याच्या विकासासाठीही हातभार लागणार आहे