ऊस वाहतूक करणाऱ्या ट्राली बनत आहेत जीवघेण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:02+5:302021-01-25T04:31:02+5:30
या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्राली अनेक वर्षे जुन्या आहेत. त्यातील काही मोडकळीस आलेल्या आहे, तसेच अनेक वेळा रस्त्यातच बंद ...
या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्राली अनेक वर्षे जुन्या आहेत. त्यातील काही मोडकळीस आलेल्या आहे, तसेच अनेक वेळा रस्त्यातच बंद पडतात. यामुळे ऊस मालक शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच, परंतु महत्त्वाचे म्हणजे या बंद पडणाऱ्या ट्रालींना रात्रीच्या वेळी अंधारात चमकणारे रेडियमही लावलेले नसते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना समोरील ट्रालीचा अंदाज येत नाही. या ट्रालीवर आदळून अपघात होत आहेत. अनेक ट्रालीवर तर नंबर प्लेटही नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात तर अनेक रस्ते लहान असून, हे डबल ट्रालीमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दाेन दिवसांपूर्वी वसमत तालुक्यातील कौठा पाटीवर अशाच टायर पंक्चर झालेल्या उभ्या ट्रालीवर पाठीमागून आदळून पोस्टाच्या परीक्षा देण्यासाठी निघालेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या मार्गावर ट्रालीद्वारे उस वाहतुकीमुळे अपघात घडत आहेत. फाेटाे नं. ०३