ट्रक-बसची समोरासमोर धडक; चालकासह २५ प्रवासी जखमी 

By विजय पाटील | Published: July 15, 2023 06:38 PM2023-07-15T18:38:55+5:302023-07-15T18:39:12+5:30

वगरवाडीजवळ पुलावर बस आणि ट्रक समोरासमोर धडकले.

Truck - Bus head-on collision; 25 passengers including the driver were injured | ट्रक-बसची समोरासमोर धडक; चालकासह २५ प्रवासी जखमी 

ट्रक-बसची समोरासमोर धडक; चालकासह २५ प्रवासी जखमी 

googlenewsNext

औंढा नागनाथ : वसमतकडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसची परभणीकडून येत असलेल्या गॅसवाहक ट्रकसोबत वगरवाडीजवळ समोरासमोर धडक झाली. यात एकूण २५ प्रवासी जखमी आहेत. तर चालकासह चार प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजता झाला. 

औंढा नागनाथ बसस्थानकातून बस ( क्रमांक २०बी एल ३९७१) वसमतकडे रवाना झाली. तर याच वेळी गॅसच्या रिकाम्या टाक्या घेऊन एक ट्रक ( क्रमांक. एएम एच. बी ई. २६६६) छत्रपती संभाजीनगरकडे निघाला. साज सायंकाळी पाच वाजता वगरवाडीजवळ पुलावर बस आणि ट्रक समोरासमोर धडकले. यात चालकाच्या बाजूने बसचे मोठे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले. यातील चालक रुस्तुम सारंग, कोंडबा जाधव व इतर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. महामार्गावर मधोमध दोन्ही अपघातग्रस्त वाहने अडकली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी स्थानिक नगरसेवक तसेच इतर वाहनधारकांनी अपघातग्रस्त प्रवाशांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी मदत केली. 

खासदार आले मदतीला धावून 
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे नांदेडकडे जात असताना हा अपघात झाला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना खा. पाटील यांनी स्वतःच्या गाडीमधून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

Web Title: Truck - Bus head-on collision; 25 passengers including the driver were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.