‘त्या’ ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:50 AM2019-01-12T00:50:39+5:302019-01-12T00:50:58+5:30

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोडजवळ उत्तर प्रदेशच्या एका ट्रकमधून बनावट सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ट्रकमध्ये बनावट सिगारेट आढळून आल्याने ट्रकचालक व मालकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

 The 'truck driver' filed a complaint against him | ‘त्या’ ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

‘त्या’ ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोडजवळ उत्तर प्रदेशच्या एका ट्रकमधून बनावट सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ट्रकमध्ये बनावट सिगारेट आढळून आल्याने ट्रकचालक व मालकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक अवधेशकुमार राधेश्याम तिवारी व ट्रक मालक हरिप्रसाद तिवारी रा. दिल्ली या दोघांविरूद्ध पॅकेजिंग लंबलिग अधिनियम २००९ सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ जाहिरातीतील प्रतिबंधक अधिनियम २००३ चे कलम ७ व २० प्रमाणे गुन्हा दाखल केला. ट्रक क्र. एचआर-५५ एम २७०३ मधून बनावटी सिगारेट नेताना त्यावर आरोग्यासाठी धोकादायक असा मजकूर नव्हता. दोन ट्रकमधून बनावट सिगारेट नेत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच पथकाला मिळाली होती. त्यावरून पार्डीमोडजवळ एचआर ५५ एम २७०३ व एचआर ५५ के. ९३९६ हे दोन ट्रक १० जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात आले. ट्रक क्र. एचआर ५५ एम २७०३ मध्ये ५८ लाख ५० हजाराचे बनावट सिगारेट आढळून आले. त्यामुळे या ट्रक मालक व चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. ११ जानेवारी ट्रक क्र. एचआर ५५ के. ९३९६ ची तपासणी केली असता त्यात काहीच आढळून आले नाही. त्यामुळे हा ट्रक सोडून देण्यात येणार असल्याचे फौजदार केंद्रे यांनी सांगितले.

Web Title:  The 'truck driver' filed a complaint against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.