महामंडळ कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:16 AM2018-03-02T00:16:58+5:302018-03-02T00:17:04+5:30
येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे महामंडळ कार्यालयास शासन निधीच देत नसल्याने लाभार्थी पाच ते पन्नास हजार रुपयाच्या कर्जासाठी अनेक वर्षापासून खेटे मारत आहेत. या निषेधार्थ लाल सेनेच्या वतीने १ मार्च रोजी या महामंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाºयांच्या विनंतीवरून ते लगेच उघडलेही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे महामंडळ कार्यालयास शासन निधीच देत नसल्याने लाभार्थी पाच ते पन्नास हजार रुपयाच्या कर्जासाठी अनेक वर्षापासून खेटे मारत आहेत. या निषेधार्थ लाल सेनेच्या वतीने १ मार्च रोजी या महामंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाºयांच्या विनंतीवरून ते लगेच उघडलेही.
या महामंडळ कार्यालयात मातंग समाजातील लाभार्थी निधीसाठी खेटे घेत आहेत. मात्र कार्यालयास निधी नसल्याने अनेक लाभार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरत आहे. त्यामुळे मातंग समाजात सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल संताप पसरल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणने आहे. त्यामुळेच १ मार्च रोजी महामंडळ कार्यालयास कुलूप ठोकून विविध मागण्याचे निवेदन देत असल्याचेही सांगितले.
निवेदनावर कॉ. गणपत भिसे, देवीदास खरात, साहेबराव कांबळे, किशोर कांबळे, चेतन पाटोळे, नवनाथ शिखरे, उत्तम खंदारे, सुशिल कसबे, प्रमोद शिखरे, सागर शिखरे यांच्या स्वाक्षºया आहेत.