हळद आता जागतिक बाजारपेठेत; बीएसईसोबत झाला करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:39+5:302021-06-06T04:22:39+5:30

हिंगोली : येथील हळदीला जागतिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने खा. हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून हळदीची सौंदर्यप्रसाधने , ...

Turmeric is now in the global market; Agreement reached with BSE | हळद आता जागतिक बाजारपेठेत; बीएसईसोबत झाला करार

हळद आता जागतिक बाजारपेठेत; बीएसईसोबत झाला करार

Next

हिंगोली : येथील हळदीला जागतिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने खा. हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून हळदीची सौंदर्यप्रसाधने , औषध निर्मिती आणि इतर प्रक्रिया उद्योगामध्ये मागणी वाढावी, याकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांच्याअंतर्गत असलेल्या बीम (BEAM) या कंपनीसोबत हिंगोली जिल्ह्यातील सूर्या व तुकाई फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यासोबत पॅकिंग , ग्रेडिंग आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने साठवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

यावेळी बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, बीमचे राजेश सिन्हा, समीर पाटील, नीरज कुलश्रेष्ठा, उपमहाव्यवस्थापक पिनाकीन दवे, रुद्र हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. बीएसई हा आशिया खंडातील प्रथम स्टॉक एक्सचेंज आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्यांअंतर्गत कायम मान्यता मिळालेला देशातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. हळद हा खाद्यपदार्थच नाही तर परदेशांमध्ये हळदीचा औषधासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोठमोठ्या औषधी कंपन्या हळदीवर अनेक प्रयोग करत आहेत . त्यांच्या मागणीप्रमाणे आपल्याकडच्या हळदीच्या लागवड पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. पाटील यांनी या संदर्भाने हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला जागतिक बाजारपेठेत कशाप्रकारे स्थान मिळेल, यासाठी पुढाकार घेतला आहे. हळदीच्या ग्रेडिंग, पॅकिंग आणि गोदामातील साठवणुकीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने सुसूत्रता येण्यासाठी हा करार केला आहे. सोबतच शेतकऱ्यांना पिकाचा तात्काळ परतावा मिळावा यासाठी सुद्धा करार करण्यात आलेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी भौगोलिकदृष्ट्या अनुकूल वातावरण असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन प्रक्रिया महामंडळ स्थापण्यास अनुमती दिली आहे. त्याच अनुषंगाने हळदीच्या नवनवीन संकरित बेणे द्वारे आणि नव्या लागवड पद्धतीद्वारे हळदीची लागवड करून उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत.

Web Title: Turmeric is now in the global market; Agreement reached with BSE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.