वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:20+5:302021-07-16T04:21:20+5:30
जिल्ह्यात सन २०१८ मध्ये मनुष्यबळी २, सन २०१९ मध्ये मनुष्यबळी ३, सन २०२० मध्ये मनुष्यबळी २ तर सन ...
जिल्ह्यात सन २०१८ मध्ये मनुष्यबळी २, सन २०१९ मध्ये मनुष्यबळी ३, सन २०२० मध्ये मनुष्यबळी २ तर सन २०२१ मध्ये मनुष्यबळी ४ झाली आहे. दुसरीकडे सन २०१८ मध्ये २२ जनावरे, सन २०१९ मध्ये १५ जनावरे, सन २०२० मध्ये २३ जनावरे तर सन २०२१ मध्ये २० जनावरे वीज पडून दगावली आहेत. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन शेतातील कामे उरकून घेणे गरजेचे आहे. विजा, पाऊस आणि वारे वाहत असेल शेतातील कामे करणे बंद करावीत.
जिल्ह्यातील वीज अटकाव यंत्रणा ....जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी आणि हिंगोली तालुक्यातील साटंबा येथे वीज अटकाव यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. याबाबत गरज पडल्यास किंवा माहिती जाणून घ्यायची झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
पाण्याचे नळ, फ्रीज, मोबाईल,टेलीफोनला स्पर्श करु नका, बाहेर असाल तर भ्रमणध्वनी बंद करावा, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली आश्रय घेऊ नका, दोन चाकी तसेच सायकलवर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी निघून जाणे हिताचेच आहे, धातुची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केले आहे.
कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई ...
२०१८ पासून आतापर्यंत वीज पडल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १० जणांना आतापर्यंत शासनाकडून माणसी ४ लाख रुपयाप्रमाणे मदत केली आहे. कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथील एकाला अजून मदत मिळाली नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.