दोन दुचाकी जप्त ; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:13+5:302021-07-13T04:07:13+5:30

सेनगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी रिधोरा पाटी परिसरात एकजण चोरीची दुचाकी घेऊन ...

Two bikes seized; Filed a crime | दोन दुचाकी जप्त ; गुन्हा दाखल

दोन दुचाकी जप्त ; गुन्हा दाखल

Next

सेनगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी रिधोरा पाटी परिसरात एकजण चोरीची दुचाकी घेऊन थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोेटे, सपोउपनि बालाजी बोके, पोना संभाजी लेकूळे, राजू ठाकूर भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, शेख जावेद, प्रशांत वाघमारे आदींच्या पथकाने पुसेगाव पाटी मार्गे रिधोरा पाटी परिसर गाठला. यावेळी एका दुचाकीस्वारास दुचाकी विषयी माहिती विचारली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विठ्ठल शंकर गाडे (रा. रिधोरा) असे सांगितले. तसेच त्याच्याकडे दोन दुचाकी असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या असून सेनगाव पोलीस ठाण्यात लावल्या आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two bikes seized; Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.