एकाच विषयाच्या दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:31 AM2019-10-11T00:31:32+5:302019-10-11T00:31:54+5:30
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. केंद्रचालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. आता या प्रकाराची दुरूस्ती कशी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
वसमत येथील सावित्रीबाई फुले बीसीए महाविद्यालयात या वेळी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावर पहिलाच पेपर गुरूवारी झाला. पुरवणी परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बीएससीच्या प्रथम वर्षाच्या सेकंड सेमीच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. या पेपरमध्ये सावित्रीबाई फुले महाविद्यालयात दुसऱ्या केंद्रावरील पेपर पेक्षा वेगळीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली. पेपर सुटल्यानंतर दोन्ही केंद्रातील विद्यार्थ्यांची आपसात चर्चा झाली असता हा प्रकार समोर आला. काही विद्यार्थ्यांनी प्राचार्यांश्ी संपर्कही साधला असता त्यांनी चुकून हा प्रकार घडला आहे. उद्या पुन्हा पेपर सोडवून घेवू असे आश्वासन देवून विद्यार्थ्यांची बोळवण केली मात्र आपण चुकीची प्रश्नपत्रिकी सोडवली असल्याने नापास होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. आता या प्रकारावर काय तोडगा काढला जाते हे पाहणे रंजक ठरणार आहे. सावित्रीबाई फुले महाविद्यालयास याच परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्र मिळाले आणि पहिल्याच पेरपरला घोळ आल्याने मात्र गोंधळ उडाला आहे. या संदर्भात सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बीएससी सेकंड सेमीस्टरच्या इंग्रजी पेपर पिंट करताना कर्मचाºयाची चुक झाली त्यामुळे हा प्रकार घडला आहे. सदर प्रकार विद्यापीठास कळविला असून परीक्षर्थींचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठा तर्फे सध्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमत येथील दोन परीक्षा केंद्रावरील एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिकेच्या प्रकारामुळे मात्र गोंधळ उडाला आहे. वसमत शहरात गुरूवारी या प्रकाराची दिवसभर चर्चा ऐकवयास मिळत होती.