नव्या जोडणीला दोन शेतकऱ्यांत एक डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:18 AM2018-10-28T01:18:34+5:302018-10-28T01:19:45+5:30
महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांनी कोटेशन भरले म्हणून अवैध जोडण्या केल्या आहेत. त्यामुळे भार वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध डीपींवर अतिरिक्त ताण पडत आहे. जिल्ह्यात कोटेशन भरूनही जोडणी न मिळालेले पाच हजारांवर शेतकरी आहेत. अशा प्रतीक्षा यादीतील पहिल्या पाच हजार शेतकºयांना जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदांपैकी ९ निविदा मंजूर झाल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. तर आणखी सहा निविदा एकत्रित करून वरिष्ठ स्तरावरून त्याची फेरनिविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात या नवीन जोडण्यांना डीपीही कमी क्षमतेचे राहणार असून ते एका किंवा दोन जोडण्यांसाठी स्वतंत्र राहतील. या डीपीवर अतिरिक्त जोडणीच करणे शक्य राहणार नाही. शिवाय ती झाल्यास संबंधित शेतकºयालाच त्याचा त्रास होणार असल्याने तो करू देणार नाही.
या योजनेमुळे वीजचोरीला आळा बसणार असून जवळपास ५१0५ नवीन जोडण्यांना असे डीपी मंजूर झाले. त्यात १0 केव्हीएच्या डीपींची संख्या ४२९७ एवढी राहणार आहे. तर १६ केव्हीएचे ५७ असतील. कृषीपंपाच्या एचपीनुसार त्यावरील जोडण्या निश्चित केल्या जाणार आहेत. औंढा नागनाथ, जवळा बाजार व शिरडशहापूर, बाळापूर १ व २, हिंगोली ग्रामीण १ व २, हट्टा, सेनगाव, गोरेगाव-१ व २ च्या क्षेत्रात एकूण २९६३ नवीन जोडण्या देण्यात येणार आहेत. ही जवळपास ४७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. यामध्ये डीपी बसविण्यापर्यंतची यंत्रणा, उच्च व लघुदाब वाहिनी, खांब व इतर साहित्याचा यात समावेश आहे. तर नांदापूर, वारंगा, जवळापांचाळ, डोंगरकडा, कळमनुरी शहर, नर्सी, कन्हेरगाव नाका, हिंगोली शहर १ व २, कुरुंदा १, गिरगाव, सेनगाव-२ आदींची २१४२ जोडण्यांची निविदा एकत्रित निघणार आहे. यात १0 केव्हीएचे १७९२ व १६ केव्हीएचे ३0 डीपी राहतील. यापूर्वी या निविदा झाल्या नाहीत. मंजूर व फेरनिविदेतील एकूण कामे जवळपास ८७ कोटींची असून यामुळे जिल्ह्यातील नवीन जोडणी घेणाºया शेतकºयांना फायदा होणार असल्याचे चित्र आहे.
हाताळणी सोपी : वीजचोरीला आळा
याबाबत कार्यकारी अभियंता रामगिरवार म्हणाले, या नव्या प्रयोगामुळे जिल्ह्यात नवीन जोडण्यांना जे डीपी मिळाले. ते थेट उच्चदाब वाहिनीला जोडलेले असतील. त्यामुळे वीजचोरीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. शिवाय या डीपीवरील शेतकºयांना त्या डीपीची अधिक काळजी राहिल. डीपी जळाल्यास ती मोटारसायकवरून दुरुस्तीला आणता येईल, इतकी हाताळणी सुलभ आहे. नवीन कामांप्रमाणेच टप्प्या-टप्प्याने जुन्याही डीपी काढून असाच प्रयोग महावितरण करण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
यामुळे शेतकºयांना योग्य भाराच्या डीपीमुळे ती जळण्याचे प्रमाण कमी होईल. जळाल्यानंतरच्या रांगेतून मुक्तता होईल. मात्र थकबाकीत जाता येणार नाही. अन्यथा वीज तोडणे सोपे राहणार आहे.