२ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:34 AM2019-04-12T00:34:16+5:302019-04-12T00:34:38+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी क्षेत्रिय अधिकारी किशोर लिपने यांना ११ एप्रिल रोजी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी क्षेत्रिय अधिकारी किशोर लिपने यांना ११ एप्रिल रोजी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत व मुदतीत पूर्ण व्हावेत यासाठी संत नामदेव प्राथमिक आश्रमशाळा गांगलवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब श्रीराम पवार, रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रमशाळा गांगलवाडीचे सहाय्यक शिक्षक सुधीर तुळशीराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे दोन्ही कर्मचारी प्रशिक्षणाचे आदेश मिळूनही प्रशिक्षणाला गैरहजर होते. या दोन कर्मचाºयांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यांनी खुलाशात वैद्यकीय कारण दाखविले होते. या दोन कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडे पाठविण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे वैद्यकीय मंडळ व या दोन कर्मचाºयास कळविले होते. वैद्यकीय तपासणीची तारीखही या कर्मचाºयांना दिली होती. ११ एप्रिल पूर्वी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वैद्यकीय तपासणीबाबत या दोन कर्मचाºयांना ९ एप्रिल रोजी तहसीलदार औंढा नागनाथ यांच्यामार्फत कळविले होते. पत्रही घेऊन जाण्यास या कर्मचाºयांना सांगितले होते. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डावर चिटकविण्यात आले व पंचनामा करण्यात आला. या दोन कर्मचाºयांची कृती निवडणुकीच्या कामामध्ये कुचराई व टाळाटाळ करणारी आहे. दोन्ही कर्मचारी निवडणुकीच्या कामात गंभीर नसल्याचे दिसून आले. निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यासाठी क्षेत्रिय अधिकाºयांना प्राधिकृत केले आहे. या दोन कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करून अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.