औंढा नागनाथ येथे जुन्या वादातून दोन गट समोरासमोर भिडले; ३० जणांविरोधात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:58 PM2018-05-02T16:58:32+5:302018-05-02T16:58:32+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे जुन्या वादातून सोमवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास दोन गट समोरा समोर आल्याने तुंबळ हाणामारी झाली.

Two groups came face to face with the old controversy in Aundha Nagnath; Criminal cases filed against 30 people | औंढा नागनाथ येथे जुन्या वादातून दोन गट समोरासमोर भिडले; ३० जणांविरोधात गुन्हे दाखल

औंढा नागनाथ येथे जुन्या वादातून दोन गट समोरासमोर भिडले; ३० जणांविरोधात गुन्हे दाखल

googlenewsNext

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे जुन्या वादातून सोमवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास दोन गट समोरा समोर आल्याने तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे २ मे  रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परंविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्हीही गट  ठाण्यात आल्याने ठाण्याला मात्र यात्रेचेच स्वरुप आले होते. 

शिवाजी निवृत्ती काशिदे यांच्या फिर्यादीवरुन मधूकर कचरु काशिदे, साहेबराव काशिदे, अंबादास गणपत काशिदे, चंद्रमुनी काशिदे, सोपान मधूकर काशिदे, विशाल काशिदे, प्रविण आंबादास काशिदे, विनोद काशिदे,  संजीव काशिदे, भीमराव पंडित, गजानन काशिदे, राहूल काशिदे व अन्य एक असे १३ विरुद्ध तर मधूकर कचरु काशिदे यांच्या फिर्यादीवरुन माणिक अशोक पंडित, शिवाजी निवृत्ती काशिदे, गुलाब भिवाजी धाबे, बाबूराव काशिदे, राहूल कैलास पंडित, सूर्यभान निवृत्ती काशिदे, बाबाराव पुंडगे, शशिकलाबाई पंडित, उत्तम पंडित, अशोक पंडित, अनिरुद्ध पुंडगे यांच्यासह अन्य पाच असे १६ जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोनि मारोती थोरात यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि प्रकाश सरोदे हे तपास करीत आहेत.  

Web Title: Two groups came face to face with the old controversy in Aundha Nagnath; Criminal cases filed against 30 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.