कळमनुरीत दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार, तलवारीने जबर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:49 PM2021-11-23T12:49:16+5:302021-11-23T12:51:46+5:30

Crime In Hingoli: सोमवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता.  वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले.

Two groups clashed in Kalamanuri; Firing from gavathi katta, fierce fighting with sword | कळमनुरीत दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार, तलवारीने जबर हाणामारी

कळमनुरीत दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार, तलवारीने जबर हाणामारी

Next

कळमनुरी ( हिंगोली ) : येथे सोमवारी रात्री साडे आठ नऊच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून तलवारी व गावठी बंदुकीचा वापर करण्यात आला. यात पाच जण जखमी झाली असून यातील दोघांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.  या घटनेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

कळमनुरी शहरात सोमवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता.  वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाकडून तलवारीने वार करून गावठी कट्टा ने फायर करण्यात आले. तसेच वाहने अडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात दूध डेरी व कॉम्प्लेक्सची तोडफोड करण्यात आली. एकाच्या घरात घुसून  सामानाची नासधूस करण्यात आली. तर दुसर्‍या गटाकडूनही शिवीगाळ करून दगड, लाठी, रॉड, टोअल बोअर बंदुकीने मारहाण करण्यात आली. दोन्हीं गटाकडून एक ते दीड तास झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. त्यांना उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,  सहायक पोलीस अधीक्षक यतीस देशमुख, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावर,   पोलीस उप निरीक्षक सिद्दिकी आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली.  यावेळी शहरातील इंदिरानगर भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.  तसेच ठिकठिकाणी पोलीस नियुक केले आहेत. सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे.

परस्पर विरोधी ५० जणांवर गुन्हा दाखल
यावेळी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी ५० जणांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात अब्राज खान अफरोज खान पठाण(रा.पठाण मोहल्ला कळमनुरी) यांच्या फिर्यादीवरून सतनामसिंग हत्यारसिंग टाक, गणेशसिंग हत्यारसिंग टाक, बबलूसिंग हत्यारसिंग टाक, कर्तारसिंग हत्यारसिंग टाक, अजयसिंग हत्यारसिंग टाक, देवासिंग बावरी, जुगनसिंग टाक, राजासिंग देवासिंग टाक, भगतसिंग जुगनसिंग टाक, प्रेमसिंग सतनामसिंग टाक, रामसिंग हत्यारसिंग टाक, गन्यासिंग हत्यारसिंग टाक, जहांगीर टाक, हत्यारसिंगचे तीन जावई व इतर तीन ते चार जणांविरुद्ध( सर्व रा. इंदिरानगर कळमनुरी ) गुन्हा नोंद झाला आहे. तसेच रामसिंग हत्यार सिंग टाक यांच्या फिर्यादीवरून शेख शकील शेख खलील, शाईन मतीन नाईक, अझहर ओयल्यात खान पठाण, खाजा सादुल्ला पठाण, मोईन मतीन नाईक,  शईन मतीन नाईक,  जम्मू शेख खलील,  आरेफ खलील शेख, जमीर खलील शेख, असेफ खलील शेख, टोबो खलीलचा लहान मुलगा, शाहरुख शरीफ शेख, मुजफ्फर सिद्दिकी, ऐहसास उलहक सिद्दिकी, अतिक ओयल्यात पठाण, शाहरूख कुरेशी, सय्यद रफिक सय्यद अली, सलीम सादुल्ला पठाण, साजिद खा सलीम खा पठाण, माजिद खान डिशवाले,  खाजा तज्जू पठाण, जावेद बाबर पठाण, बबलू सत्तार पठाण, चांदपाशा सत्तार शेख, शेख अखिल फावडा, गेंडा महेबूब यांचा मुलगा, सोनू दाऊद चे दोन मुले (सर्व रा. कळमनुरी) याचे विरुद्ध  येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Two groups clashed in Kalamanuri; Firing from gavathi katta, fierce fighting with sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.