वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:04 AM2018-01-16T00:04:20+5:302018-01-16T00:04:23+5:30

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर आॅटोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी लासीना फाटा येथे घडली होती.

 Two killed in different accidents | वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर आॅटोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी लासीना फाटा येथे घडली होती. अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान अखेर १३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मृत्यू झाला.
विद्यासागर विद्यालय खानापुर चिता येथील शिक्षक शिवाजी कोरडे लासिना पाटीवरून हिंगोलीकडे जात असताना आॅटो क्रमांक एमएच-३८-७०२५ च्या चालकाने वाहन वेगात व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातामध्ये कोरडे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. १३ जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दत्ता कोरडे यांच्या फिर्यादीवरून आॅटो चालकाविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
शिरडशहापूर : औंढा- वसमत राज्य रस्त्यावर सेंदुरसना पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत नामदेव बाबूराव लेकुळे (२८, रा. कुपटी ता.वसमत) हा तरूण चोंढी आंबा येथील बँकेतून पैसे काढून सेंदूरसना पाटीजवळील शेतात जात असताना भरधाव वेगाने जाणाºया वाहनाने त्यास जोराची धडक दिली. यात नामदेव याच्या मानेस मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ उपजिल्हा रूग्णालय वसमत येथे नेले असता त्यास डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. बीट जमादार शंकर इंगोले यांनी पंचनामा केला. कुरूंदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title:  Two killed in different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.