आणखी दोन गुन्ह्यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:16 AM2019-03-15T00:16:43+5:302019-03-15T00:16:57+5:30
तालुक्यातील साखरा येथील दुकान बंद करुन येलदरीकडे जाणाऱ्या सराफाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांनी पोलीस कोठडीत आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील साखरा येथील दुकान बंद करुन येलदरीकडे जाणाऱ्या सराफाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांनी पोलीस कोठडीत आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून चाकूचा धाक दाखवून लुटणाºया टोळीने उच्छाद मांडला होता. रस्त्यावरुन प्रवास करणाºया अनेक व्यापाऱ्यांना या टोळीने लुटले होते. तालुक्यातील विविध भागात दोन महिन्यांत ६ घटना घडल्या होत्या. सदर आरोपींचा मागावर पोलीस यंत्रणा असताना मगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास साखरा येथील दुकान बंद करून दुचाकीवरून येलदरीकडे जाणाºया सराफीस या टोळीने लुटले. दोन दुचाकीवर असलेल्या तीन चोरट्यांनी साखरा येथून पाठलाग करीत लिंबाळा पाटीनजीक गजानन डहाळे यांना आडवून गळ्याला चाकू लावला. त्यांच्याकडील १ लाख २३ हजार रुपयांचे सोने- चांदीची दागिने ठेवलेली बॅग हिसकावून सेनगावच्या दिशेने पलायन केले. डहाळे यांनी हे पोलिसांना कळविले. त्यानंतर सेनगाव-वरुडचक्रपान रस्त्यावर नदीनजीक दोन चोरट्यांना पोलीस व काही तरुणांनी पकडले होते. बॅगही मिळाली. गोपाल देवराव पायघन (२६, रा. अंजनखेडा, जि.वाशिम), दिनकर पांडुरंग रणबावळे (३६), गोपाल श्रीराम लांडगे (२६) (दोघेही रा. माझोड, ता.सेनगाव) या तिघांना पकडले होते. सेनगाव येथील न्यायालयाने बुधवारी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी लिंगदरी पाटीवजळ व अकोला जिल्ह्यात एकाला लुटल्याची कबुली दिली होती. तर प्रमुख सूत्रधार गोपाल पायघनचा अनेक गुन्ह्यामध्ये समावेश असून तो अन्य साथीदाराबरोबर इतर गुन्ह्यात समावेश असू शकतो, असा अंदाज पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांनी व्यक्त केला. चोरट्यांकडून विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून त्याचा तपासही लावला जाणार आहे.