विजेच्या धक्क्याने दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:36 AM2018-05-05T00:36:42+5:302018-05-05T00:36:42+5:30
येथील शास्त्रीनगरच्या पाठीमागे शेतात काम करणाऱ्या शेतक-यास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील शास्त्रीनगरच्या पाठीमागे शेतात काम करणाऱ्या शेतक-यास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
कळमनुरी येथील सुनील रामजी पातोंडे (३६) हे शेतात काम करीत होते. यावेळी लोखंडी खांबाला पातोंडे यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे विद्युत खांबावर काम करत असताना लाईनमन बापूराव सीताराम ढोले शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी ११. ३० वाजता घडली.