भविष्य निर्वाह व निवृत्तीवेतनासाठी दोन पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:37 AM2018-11-05T00:37:16+5:302018-11-05T00:37:35+5:30

भविष्य निर्वाह निधी व अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन पथके स्थापन केली असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन अस्थापनांचे काम दिले आहे. ३१ डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के. हिवाळे यांनी दिला आहे.

 Two Squads for Future and Pensions | भविष्य निर्वाह व निवृत्तीवेतनासाठी दोन पथके

भविष्य निर्वाह व निवृत्तीवेतनासाठी दोन पथके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भविष्य निर्वाह निधी व अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन पथके स्थापन केली असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन अस्थापनांचे काम दिले आहे. ३१ डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के. हिवाळे यांनी दिला आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळालेल्या नसल्याच्या तक्रारी मध्यंतरी होत होत्या. वार्षिक पावत्या असल्याने अनेकजण ते नेतही नाहीत. मात्र अनेकांना त्या मिळाल्याच नसल्याची ओरड असून काहींची हिशेब जुळत नसल्याची तक्रार आहे. त्याचबरोबर अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारीही आहेत. अनेकांची कपात झाली मात्र पावत्या नाहीत. तर काहींची कपात बंद झाली पुढे जुन्या रक्कमेची कोणतीच माहिती मिळाली नाही, अशी ओरड होती. मध्यंतरी पुन्हा कपात सुरू झाल्याने असलेली ओरडही वेगळी. याबाबत जि.प.सदस्य बाळासाहेब मगर यांनीही तक्रार केली होती. त्यानंतर वित्त विभागाने यात दोन पथकांचीच स्थापना केली. या पथकांनी या दोन्ही बाबीतील प्रकरणांचा तालुकानिहाय व विभागनिहाय निपटारा करण्याचा आदेश कॅफोंनी दिला आहे. तर सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा आढावा घेण्यासही सांगितले आहे. या सर्व कर्मचाºयांच्या वेतन आयोगाच्या अपूर्ण हप्त्यांचे लेखांकन करून सुधारित विवरणपत्रे निर्गमित होतील, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. तर पं.स. अथवा विभागप्रमुखांनी भविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्तीवेतन योजनेच्या वर्गणी कपातीचे धनादेश व परिशिष्ट जिल्हा परिषदेस पाठविले नसल्यास ते प्राप्त करून घेवून ज्यांनी ही माहिती पाठविली नाही, त्याचा एकत्रित अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविण्यासही सांगण्यात आले. यासाठी जिल्हा परिषदेतील दोन अधिकाºयांच्या नेतृत्वात प्रत्येकी तीन पथके नेमली आहेत. या प्रत्येक पथकात प्रत्येकी तीन कर्मचाºयांचीही तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांना कामासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे.
अशी आहेत पथके
उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पी.बी.काळदाते यांच्या नेतृत्वात हिंगोली पं.स.साठी स.ले.अ. श्याम बांगर, आर.आर.निंबाळकर, संदीप गोबाडे, वसमत पं.स.त सलेअ पी.एस.पवार, ए.व्ही. पुंड, आर.बी. बळवंते, कळमनुरी पंस.त स.ले.अ. डी.एच. शिंदे, जी.व्ही. हिबारे, टी.डी. डाखोरे यांचे पथक काम करणार आहे. तर लेखाधिकारी सी.के. खर्गखराटे यांच्या नेतृत्वात दुसरे पथक तयार झाले असून यात औंढा नागनाथ पं.स.त स. ले. अ. एल.के.कुरुडे, एम.पी. पिनगाळे, ए.व्ही. पांडे, सेनगाव पं.स.त स.ले.अ. एन.ए. बंडाळे, पी.बी. साळवे, पी.के.राठोड, मुख्यालयात स.ले.अ. के.एन. इंगोले, डब्ल्यू. जी. गाडेकर, के.जी. पोटे यांचे पथक स्थापन केलेले आहे.

Web Title:  Two Squads for Future and Pensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.