२४ तासांत दोन चोऱ्या उघडकीस; मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:37 AM2018-05-22T00:37:31+5:302018-05-22T00:37:31+5:30
शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला.
१६ मे रोजी मध्यरात्री नुरीबाबा यांच्या दर्गाहमध्ये चोरी होवून चोरट्याने मुख्य दरवाजा तोडून दानपेटीतील १० हजार रुपये लंपास केले होते. याच रात्री श्रद्धा पानटपरी फोडून त्यातील सामान व रोख रक्कम पळविली होती. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास फौजदार एस.एस.घेवारे यांच्याकडे देण्यात आला होता. घेवारे यांनी आपली चक्रे फिरवित व गुप्त माहितीच्या आधारे १८ मे रोजी साईनगर येथे पाठलाग करून श्रीकांत मल्किार्जून महाजन या चोरट्यास पकडले. ही कार्यवाही पोनि जी.एस.राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार घेवारे, आर.पी.जाधव, राजीव जाधव, शिवाजी पवार, अविनाश राठोड यांनी केली. श्रीकांत महाजन या चोरट्यांकडून दानपेटीतील ३२२९ रुपये रोख व कुलूप तोडण्याची टॉमी जप्त केली. या चोरट्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. श्रद्धा पानटपरी फोडणाºया श्रीकांत मगर या चोरट्यास २१ मे रोजी पकडले. त्याला विचारपूस केली असता आपण पानटपरी फोडल्याचे सांगितले. त्याच्याकडून गुटख्याच्या पुड्या, रोख रक्कम ६५० रुपये जप्त केले. या दोन चोरट्याकडून आणखी चोºया उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे घेवारे यांनी सांगितले. मागील दोन वर्षांपासून छोट्या मोठ्या चोºयांचे सत्र सुरू होते. चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना आता यश आले आहे. अवघ्या चोवीस तासांत चोºयांचा तपास लावल्यामुळे कळमनुरी पोलिसांचे कौतुक होत आहे.