‘त्या’ प्रकाराची होतेय कनेरगावात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:20 AM2019-03-15T00:20:43+5:302019-03-15T00:21:02+5:30

मराठवाडा-विदर्भ सीमेवर पैनगंगा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळ अधिकाºयास झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. आपल्या हद्दीत वारेमाप अवैध उपसा होत असताना ही मंडळी दुसऱ्यांच्या हद्दीतील कारभार नेटका करायला कशासाठी गेली होती? अशी चर्चा होत आहे.

 'That' type is discussed in Kanargaon | ‘त्या’ प्रकाराची होतेय कनेरगावात चर्चा

‘त्या’ प्रकाराची होतेय कनेरगावात चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगाव नाका : मराठवाडा-विदर्भ सीमेवर पैनगंगा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळ अधिकाºयास झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. आपल्या हद्दीत वारेमाप अवैध उपसा होत असताना ही मंडळी दुसऱ्यांच्या हद्दीतील कारभार नेटका करायला कशासाठी गेली होती? अशी चर्चा होत आहे.
हिंगोली तहसीलच्या हद्दीत अवैध वाळू उपशाचे प्रमाण मोठे आहे. या भागातून हिंगोलीकडे वाळु जाते. मात्र त्यावर कारवाई करायची सोडून तहसीलची पथके वाशिमच्या हद्दीतील वाहनांना डिवचत आहेत. ११ मार्च रोजी रात्री कानरखेडा खु. येथील पैनगंगा नदीच्या पात्रात सुकळी बॅरेजजवळ एका ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू भरत असताना पथकाने ट्रॅक्टर पकडले. परंतु ट्रॅक्टर चालकाने ग्रामस्थांना जमवत मंडळ अधिकाºयांनाच धक्काबुक्की केली. हद्दीच्या प्रश्नाने पोलीस व महसूल प्रशासनही मदतीला आले नाही.

Web Title:  'That' type is discussed in Kanargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.