उडीद, मूग उत्पादक आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:07 AM2018-01-16T00:07:00+5:302018-01-16T00:07:04+5:30
तालुक्यातील आडगाव येथील शेतक-यांनी खरेदी विक्री संघाच्या हमीभाव केंद्रावर विकलेल्या उडीद व मुगाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. ते तात्काळ अदा करा अन्यथा २५ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील आडगाव येथील शेतक-यांनी खरेदी विक्री संघाच्या हमीभाव केंद्रावर विकलेल्या उडीद व मुगाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. ते तात्काळ अदा करा अन्यथा २५ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
आडगाव येथील केशव मुटकुळे, प्रकाश मुटकुळे, रमेश मुटकुळे, अशोक मुटकुळे, समीर मुरकुंदे, पवन मुरकुंदे, रामजी भालेराव, विलास मुटकुळे या आठ ते दहा शेतकºयांनी २६ आॅक्टोबर, १ व २ नोव्हेंंबरला या हमीभाव केंद्रावर आपला १ ते ७ क्ंिवटलपर्यंत उडीद व मूग विकला. मात्र त्यांना अद्याप चुकारे मिळाले नाहीत. खरेदी विक्री संघ व इतर कोणीच त्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.