सरकार दारी, थापा मारतंय लय भारी, हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:01 AM2023-08-28T10:01:02+5:302023-08-28T10:02:57+5:30

ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले.

Uddhav Thackeray's criticism on Sarkar Apalya Dari Yojana in Hingoli | सरकार दारी, थापा मारतंय लय भारी, हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

सरकार दारी, थापा मारतंय लय भारी, हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

googlenewsNext

हिंगोली : जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी, अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील निर्धार सभेत केली.

ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले. तीच गत इतर मालांचीही आहे. एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचा सर्व्हे केला. तेव्हा मराठवाड्यात १ लाखावर शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आढळले.

त्यांना खरीप हंगामापूर्वी २५ हजार मदतीची शिफारस त्यांनी केली. मात्र, त्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. चांगल्या कामाचे असे भोग मिळणार असेल तर हे सरकार काय कामाचे? असा सवाल त्यांनी केला.  

माझे वडील चाेरले
ठाकरे म्हणाले, चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.

Web Title: Uddhav Thackeray's criticism on Sarkar Apalya Dari Yojana in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.