बैलजोडी परवडेना, हतबल शेतकऱ्याने अखेर भाऊ अन् भाच्याच्या खांद्यावर दिलं जू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:36 PM2024-06-24T18:36:36+5:302024-06-24T18:36:53+5:30

मोलमजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार? वसमत तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा

Unable to afford a pair of bullocks, the desperate farmer finally put the yoke on the shoulders of his brother and nephew  | बैलजोडी परवडेना, हतबल शेतकऱ्याने अखेर भाऊ अन् भाच्याच्या खांद्यावर दिलं जू 

बैलजोडी परवडेना, हतबल शेतकऱ्याने अखेर भाऊ अन् भाच्याच्या खांद्यावर दिलं जू 

- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली):
अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी परवडत नाही. बैलजोड्या महाग झाल्या असून अल्पभूधारक शेतकरी उत्पन्न काढणार काय अन् लागवड करणार काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे शेती मशागत व पेरणीसाठी बैलजोडी मिळली नसल्यामुळे बालाजी पुंडगे यांनी चक्क सखा भाऊ व साडूच्या मुलास औताला जुंपून हळदीच्या शेतात सरी मारली. शेत मुख्यरस्त्यावर असल्याने शेतात सरी मारताना हा प्रकार समोर आला. 

वसमत तालुक्यातील सिरळी परिसरात पाऊस झाला नसल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. २४ जून रोजी दुपारी १ वाजेदरम्यान अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांनी आपल्या शेतात हळदीसाठी सरी (दौसा) मारण्यास सुरुवात केली. सरीसाठी बैलजोडी मिळत नाही, आता बैल आणायचे कोणाचे आणि कोठून? हा प्रश्न अल्पभूधारक शेतकऱ्याला पडला होता. यावेळी लहान भाऊ मनोहर पुंडगे व त्यांच्या साडुच्या मुलास औताला जुंपत हळद लागवडीसाठी लागणारी सरी दोघांच्या खांद्यावर जू देऊन पूर्ण केली. 

बालाजी पुंडगे यांचे शेत वाई ते बोल्डा मार्गावर आहे. सरी मारताना बैला ऐवजी माणसाद्वारे औत हाकल्या जात असल्याचे पाहुन अनेक प्रवाशांनी त्या ठिकाणी थांबून हा प्रकार पाहिला.  बैलजोडीचा का वापर करत नाहीत हा प्रश्न अनेकांनी त्यांना केला. यावेळी प्रत्येकाजवळ भाऊक उत्तर देत आपल्या अडीअचणी समोर मांडल्या. मोलमजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार ? बैलजोडी घ्यायची म्हटल्यावर ६० ते ८० हजार मोजावे लागतात, असेही त्यांनी सांगितले. बालाजी पुंडगे यांना दोन एकर शेत जमीन असून आर्धा एकरावर हळद आहे.भाऊ व इतर परिवार रोज मजुरी व शेतीची कामे करुन कुटुंबाचा गाडा हाकतात.

Web Title: Unable to afford a pair of bullocks, the desperate farmer finally put the yoke on the shoulders of his brother and nephew 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.